बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 मे 2022 (15:31 IST)

संभाजीराजे यांनी घेतली शिवेंद्रसिंहराजेंची साताऱ्यात भेट; चर्चांना उधाण

sambhaji raje
संभाजीराजे छत्रपती यांनी शिवेंद्रसिंहराजे  भोसले यांची साताऱ्यात धावती भेट घेतली. यामुळे भविष्यात दोन्ही राजे एकत्र येऊन राज्याच्या राजकारणात लक्ष घालणार असल्याची चर्चा रंगली आहे. यातच संभाजीराजे छत्रपती यांनी शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, श्रीमंत शाहू महाराजांनी कोल्हापुरात शिवसेनेची बाजू घेतल्याने नवा वाद सुरु झाला आहे. संभाजीराजे यांच्यावर टीका करत श्रीमंत शाहू महाराजांनी शिवसेनेची बाजू घेताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांना फोनवर संपर्क करुन चर्चा केली. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली. संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यास नकार देऊन शिवसेनेने कोल्हापूरच्या संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपने तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरच्या माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या नावाची घोषणा केली आहे.