मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (08:09 IST)

किरीट सोमय्या बारामती दौऱ्यात कोणता गौप्यस्फोट करणार?, चर्चांना उधाण

भाजपचे  माजी खासदार किरीट सोमय्या बुधवारी शरद पवारांच्या  बारामती दौऱ्यावर येत आहेत. मागील काही दिवसांपासून किरिट सोमय्या  यांनी विविध राजकीय नेत्यांना ज्या प्रकारे लक्ष्य केले आहे, ते पाहता त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
प्रादेशिक परिवहन अधिकारी  असलेल्या खरमाटे  यांच्या मालमतत्तेची पाहणी करण्यासाठी ते बारामतीत येत असले तरी या निमित्ताने ते कोणावर निशाणा साधणार याबाबत उत्सुकता लागली आहे. किरीट सोमय्या बुधवारी साताऱ्याहून (Satara) कोरेगाव मार्गे जरंडेश्वर कारखान्यावर  जाणार आहेत.
 
याठिकाणी ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर पुसेगाव मार्गे डिस्कळ वरुन ते फलटण येथे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या घरी जाणार आहेत.
 
फलटण येथून दुपारी दोनच्या सुमारास बारामतीत येणार आहेत. याठिकाणी खरमाटे यांच्या जागांची पाहणी करुन ते बारामतीच्या भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून सायंकाळी जेजुरीत जाऊन खंडोबाचे दर्शन घेणार आहेत.
त्यानंतर रात्री आठ वाजता फुरसुंगी येथे जाणार आहेत.