1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

संभाजी झेंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

sambhaji zende to join NCP
आता  विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बहिणीचे पती आणि निवृत्त आयएएस अधिकारी संभाजी झेंडे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. संभाजी झेंडे यांनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडलं आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या मंचावर झेंडे यांचा राजकारणात प्रवेश होईल.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचा सासवड इथे शेतकरी मेळावा होत आहे. या मेळाव्यात संभाजी झेंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करतील. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या जावयाच्या हातात राष्ट्रवादीचं “घड्याळ” पाहायला मिळणार आहे.