बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 मे 2022 (10:14 IST)

भजनी मंडळावर काळाचा घाला

सांगलीच्या आयर्विन पुलावर रात्री भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जण जागीच ठार तर 11 जण जखमी झाले आहेत. तांमध्ये एका वृद्ध आजीचा समावेश आहे.  
 
तुंग येथील काही भजनी मंडळाच्या महिला टेम्पोमधून शिरोळकडे चालले असताना आयर्विन पुलावर समोरून येणाऱ्या कार आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहे. सुभद्रा अर्जुन येळवीकर (वय 70), इर्शाद रफिक नदाफ (वय 33) अशी या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जखमींना सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 
 
टेम्पोमधील सर्व 12 जण शिरोळला भजनी कार्यक्रमास निघाले होते. त्यावेळी या टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातातील मृत व जखमी मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज व तुंग परिसरातील आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.