शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 मे 2022 (08:58 IST)

तलाव ठेका रक्कम भरण्यास मे अखेरपर्यत मुदतवाढ

aslam shaikh
कोल्हापूर :कोरोना प्रादुर्भाव काळात आर्थिक झळ सहन कराव्या लागलेल्या राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मासेमारीकरीता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव, जलाशयांची वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यासाठी 31 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच 2021-22 तलाव ठेक्याची रक्कम माफ करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.
 
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्यावेळी राज्यात घोषित लॉकडाऊनमुळे राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना पूर्ण क्षमतेनुसार मासेमारी करता आली नाही, तसेच उत्पादित मासळीची विक्री करण्यास पुरेसा वाव न मिळाल्यामुळे मच्छीमारांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्यातील मासेमारीकरीता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव आणि जलाशयांची चालू वर्ष सन 2021-22 ची वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यासाठी 31 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.