सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 मार्च 2018 (16:35 IST)

मराठवाड्यातील तरुणांवर शासनाकडून अन्याय - संग्राम कोते पाटील

बेरोजगारांची मोट बांधत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 
बेरोजगार तरुणांना शासनाने नोकऱ्या देऊन महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत जागा वाढविणे तसेच रामलीला मैदानावरील फुटकळ व्यावसायिकांना जागा उपलब्ध करुन द्यावी यासह विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते  पाटील यांनी केले.यावेळी आमदार रामराव वडकुते, युवक प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, युवक जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे उपस्थित होते.हिंगोली येथे एमपीएससीचे परिक्षा केंद्र उभारण्यात यावे, शासकीय रिक्तपदे लवकरात लवकर भरण्यात यावे, रामलीला मैदानावर किरकोळ व्यावसायकांना ११ महिन्याच्या करारावर जागा उपलब्ध करुन द्यावी आदी मागण्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला.