सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जुलै 2019 (16:52 IST)

ही तर 'टोपीवाला आणि माकडे'

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले आहे. यावर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर काँग्रेसच्या राजीनामा नाट्याची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत 'टोपीवाला आणि माकडे' या कथेचा आधार घेत काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि राहुल गांधी यांचे नाव न घेता टोला मारला आहे. ''टोपीवाल्याने टोपी खाली टाकल्यावर, सगळ्या माकडांनी टोपी खाली टाकून दिली. याचा काँग्रेस नेत्यांच्या राजीनाम्याशी काही संबंध नाही.'' असा घुमजाव टोला राऊत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मारला आहे.