गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

संजय राऊत राज्यपालांच्या भेटीला

शिवसेना नेते संजय राऊत हे आज अर्थात सोमवारी  राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेणार आहेत. यावेळी सत्तास्थापने बद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. आपल्यापक्षासाठी नव्हे तर मित्रपक्ष भाजपासाठी ते चालले आहेत असे सांगण्यात येत आहे.

जास्त संख्याबळ असलेल्या भाजपाला सत्तास्थापनेची संधी द्यावी अशी विनंती ते करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही सदीच्छा भेट आहे. यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.