सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑगस्ट 2019 (16:54 IST)

आमच्यावर सरकारचं खूप प्रेम आहे : शर्मिला ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिलप्रकरणात ईडीकडून समन्स बजविण्यात आला आहे या प्रकरणावर बोलताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी हे प्रकरण २००८ चं आहे. आम्ही कोहिनूर मिल व्यवहारातून कधीच बाहेर पडलो आहे. मात्र आमच्यावर सरकारचं खूप प्रेम आहे. आम्हाला अशा अनेक नोटीस येत असतात. आम्ही या नोटिशींना उत्तर देण्यास सक्षम आहोत अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरेंनी दिली आहे. 
 
यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, ईडी, सीबीआयची आम्हाला सवय आहे. राज ठाकरेंना दबावात ठेवण्यासाठी हे तंत्र वापरण्यात आलं आहे. पण माझा नवरा घाबरणार नाही. निवडणुका जवळ आल्याने माझ्या नवऱ्याला चौकशीच्या फेऱ्यात अडकविण्याचा प्रयत्न आहे. मात्र चौकशीसाठी राज ठाकरेंना बोलविलं तर नक्की जाणार, सगळे पेपर त्यांना देऊ असं शर्मिला यांनी सांगितले आहे.