मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑगस्ट 2019 (16:08 IST)

मनसे अध्यक्ष राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना अश्रू अनावर

सांगली येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावाला भेट दिली आहे. पुरामध्ये या गावात बोट उलटून 16 जणांचा मृत्यू झाला होता. शर्मिला ठाकरे यांनी गावातील लोकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ब्रह्मनाळ गावकऱ्यांच्या व्यथा ऐकून शर्मिला ठाकरे यांना अश्रू अनावर झाले. 
 
यावेळी पत्रकारांसोबत बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, या महापुरामुळे लोकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मनसे सर्वोतोपरी मदत करणार आहे. या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. यामध्ये कोणतंही राजकारण नाही. मनसेचे कार्यकर्ते सुरुवातीपासून पूरग्रस्त भागात मदत करत आहेत असं त्यांनी सांगितले आहे. ब्रह्मनाळ गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणारं साहित्य, वह्या, दफ्तरे याचा संपूर्ण खर्च मनसे पक्षाकडून केला जाणार आहे अशी माहिती शर्मिला ठाकरेंनी दिली.