रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (07:58 IST)

सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांना इशारा

satej patil
सांगली - माझी सवय आहे, जे काय करायचं ते रणांगणात आणि प्रत्यक्ष लढाई असते, त्यावेळी आम्ही मैदानात कसं उतरतो ते सगळ्यांनी बघितले आहे, अशा शब्दात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी  अप्रत्यक्ष इशारा खासदार धनंजय महाडिक  आणि कोल्हापूरच्या भाजपाला दिला आहे. तसेच आजपर्यंतच्या जनतेतून ज्या निवडणूका झाल्या त्याचा कल स्पष्ट झाला आहे, असा खोचक टोलाही अप्रत्यक्ष महाडिक गटाला लगवला आहे. ते सांगली मध्ये बोलत होते.
 
सतेज पाटील यांनी राज्यसभा निवडणुकीतील पराभवावर भाष्य करताना भाजपा आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या महाडिक गटाला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. चंद्रकांत पाटील यापुढे विधानपरिषदेतील सर्व उमेदवार निवडून येणार असल्याचं विधान केला आहे. त्यावरून बोलताना सतेज पाटील म्हणाले, एका यशामुळे आता तसेच यापुढे घडणार आहे, अस चंद्रकांत पाटलांना वाटत असेल. तर तसे काही घडणार नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीकडून सर्व ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे.