गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जून 2022 (07:58 IST)

कोल्हापूरचा सर्वांगिण विकास हाच प्रमुख अजेंडा खा.धनंजय महाडिक यांची माहिती

dhananjay mahadik
कोल्हापूर निवडणुकीमध्ये मला उमेदवारी मिळेल हे माझ्या स्वप्नातही नव्हते. राज्यासह देशातील अनेक दिग्गज नेते व उद्योजक उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीमध्ये होते. तरीही महाडिक गटाच्या ताकदीवर विश्वास ठेवून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मला उमेदवारी देऊन निवडून आणले. त्यामुळे 10 जून हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा दिवस आहे. यापुढे खासदार म्हणून जिह्यातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याचा प्रथम अजेंडा असेल. त्यानंतर पक्षीय संघटनात्मक बांधणीला प्राधान्य दिले जाणार असून आगामी सर्व निवडणुकांमध्ये शतः प्रतिशत भाजप हेच ध्येय असेल, अशी माहिती राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
 
राज्यसभा निवडणुकीच्या काटाजोड लढतीमध्ये यशस्वी झालेले खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी दैनिक तरुण भारत कार्यालयास भेट दिली. यावेळी तरुण भारतचे संस्थापक (स्व.) बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी संपादक मनोज साळुंखे, जाहिरात व्यवस्थापक (ग्रामीण) आनंद साजणे, मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे, प्रशासन अधिकारी राहूल शिंदे, जाहिरात मांडणी विभाग प्रमुख विजय शिंदे, विशेष प्रतिनिधी सुधाकर काशिद, कृष्णात चौगले यांच्याशी दिलखुलास संवाद साधून आगामी काळातील विकासकामे व संघटनात्मक बांधणीचे धोरण आणि भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनिती याबाबत भूमिका स्पष्ट केली.