मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (09:19 IST)

सावंतवाडी तालुक्यातील मुलानेच केला वृद्ध आईचा खून

murder
सावंतवाडी तालुक्यातील विलवडे वरचीवाडी येथे मुलानेच आईचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दीपक विष्णू दळवी ४२ याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार दीपक याने त्याची आई राधाबाई विष्णू दळवी ७० हिच्या डोक्यावर आणि छातीवर हाताने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंके यांनी बांदा येथे भेट देत याप्रकरणी माहिती घेतली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे करत आहेत.