शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

झाडांवर कुर्‍हाड चालवणारा 'तो' विकृत सापडला

अभिनेते सयाजी शिंदे यांनी लावलेल्या शेकडो झाडांवर कुर्‍हाड चालवणारा आप्पा मदने हा विकृत सापडला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो पांढरवाडी इथलाच रहिवाशी आहे. 
 
“सयाजी शिंदे यांनी लावलेली झाडं आपल्या हद्दीत असल्याचा दावा आप्पा मदनेने केला आहे. ही झाडं लावताना कोणतीही विचारणा केली नाही”, असं आप्पा मदनेने म्हटलं आहे. माण तालुक्यातील पांढरवाडी इथं सयाजी शिंदे यांनी शेकडो झाडांची लागवड केली होती.  गेल्या सहा महिन्यापासून झाडांना पाणी घालून जगवलं. मात्र सोमवारी अचानक कुणी तरी या झाडांची कत्तल केली होती.