बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (22:33 IST)

पालकांना महागाईचा आणखी एक झटका; स्कूल बसच्या दरात वाढ

School Bus Fare : पालकांना कुठूनही दिलासा मिळत नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या नावाखाली स्कूल बसच्या भाड्यात वीस  टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. शिक्षण माफियांच्या कमिशनमुळे आधीच हैराण झालेल्या पालकांना आता स्कूल बस, स्कूल ऑटो, स्कूल व्हॅनच्या मनमानी भाड्याला सामोरे जावे लागत आहे. मनमानी पद्धतीने भाडे आकारणी आणि मनमानी तपासण्याची जबाबदारी असलेल्यांनाही पालकांच्या समस्यांशी काही देणेघेणे नाही.
 
 स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यातच आम्ही स्कूल बसच्या शुल्कात 30 टक्क्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेणार होतो. मात्र, पालकांची अडचण होऊ नये यासाठी ही दरवाढ 20 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.