गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (10:41 IST)

राज्यात दिवाळीच्या सुट्ट्यानंतर आजपासून शाळा सुरु

सध्या राज्यात ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते  बारावीचे वर्ग भरत आहे . तसेच शहरी भागात इयत्ता आठवी ते  बारावीचे वर्ग सुरु आहे .दिवाळीच्या सुट्ट्या नंतर आता हे वर्ग पुन्हा भरणार. आता शाळेची घन्टा पुन्हा वाजणार. राज्यात दिवाळीनंतर इयत्ता पहिली ते चवथीचे वर्ग सुरु होणार असे संकेत मिळाले होते .पण प्रत्यक्षात अद्याप प्राथमिक वर्ग कधी सुरु होणार हे माहिती नाही. शालेय शिक्षण विभागाकडून कोणतेही आदेश आलेले नाही .त्यामुळे शिक्षण क्षेत्रात नाराजीचे वातावरण आहे . कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरु होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यातील शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आल्या .दिवाळीची सुट्टी कमी करण्यात आली असून उर्वरित सुट्टी नाताळ किंवा उन्हाळी सुट्टींमध्ये समावेशित केली जाणार. अशी माहिती प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली.