शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 डिसेंबर 2023 (10:57 IST)

जरांगे पाटीलांच्या सभेमुळे बीड जिल्ह्यातील शाळा आज बंद

बीड मध्ये आज मनोज जरांगे यांची मोठी सभा आयोजित केली आहे. या साठी बीडमध्ये जय्य्त तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बीडच्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शंभर एकरात ही सभा होणार आहे. या सभेसाठी लाखांच्या संख्येत मराठा बांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जरांगे यांच्या वर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाण्याचे वृत्त आहे.

मराठा आरक्षणची मागणी करत मराठा आरक्षण आंदोलन पुकारण्यात आले आहे. मनोज जरांगे परील आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्ये चर्चा झाली आणि 24 डिसेंबर पर्यंत राज्यसरकारला निर्णय घेण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. आता उद्या मुदत संपत आहे. त्यावर आता आजच्या बीड मध्ये होणाऱ्या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलतात हे लक्ष देण्यासारखे आहे. मनोज जरांगे हे दुपारी बीड येथे पोहोचणार असून सभेसाठी पोलीस बंदोबस्त देखील कडक केला आहे.  
 
Edited By- Priya DIxit