सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (07:24 IST)

नाशिकमध्ये १३ डिसेंबर पासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होणार

नाशिकमध्ये  शिक्षण विभागाकडून १३ डिसेंबर पासून नाशिक मनपा हद्दीतील पहिली ते सातवी वर्गाच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर देखील तयारी करण्यात येत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय अनिश्चितता होती. मात्र शिक्षण विभाग १३ डिसेंबर पासून नाशिक मनपा हद्दीतील पहिली सातवी वर्गाच्या शाळा सुरू करण्याबाबत ठाम असून याबाबत  शासन निर्णय शिक्षण विभागाने जारी केला आहे.
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले होते. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातच ओमायक्रोन हा नवा व्हेरिएंट आढळून आल्याने पालकांसह शिक्षण विभाग काळजीत होते. मात्र नाशिक शहर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षण विभागाचे आवाहन
विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. कोविडसंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये घ्यावी. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे या गोष्टींचे पालन करावे असे सांगितले आहे.