गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 एप्रिल 2023 (21:49 IST)

... तर राज्यातील शाळांना आजपासूनच सुट्टी; मंत्र्यांनी सांगितलं कारण

Deepak Vasant Kesarkar
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा राज्यातील शाळांना २ मे पासून सुट्टी जाहीर झाली असून ही सुट्टी ११ जूनपर्यंत असणार आहे. तर, विदर्भातील शाळा मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता ३० जूनपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. शिक्षण विभागाने परिपत्रक जारी करत यासंदर्भात माहित दिली होती. मात्र, वाढत्या उन्हाचा कहर पाहता याच आठवड्यापासून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येईल. याउलट, मी शाळांना अहवाल मागवले आहेत, शक्य झालं तर आजपासूनच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  
 
शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी काढलेल्या पत्रकानुसार, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे. २ मे पासून सुरू झालेली उन्हाळी सुट्टी ही ११ जूनपर्यंत असणार आहे. तर, राज्यभरातील नव शैक्षणिक वर्ष हे जून महिन्याच्या दुसऱ्या सोमवारपासून म्हणजेच १२ जून पासून सुरू केले जाणार आहे. तर. विदर्भातील कडक उन्हाळा लक्षात घेता त्या भागातील नवं शैक्षणिक वर्ष हे जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होईल. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी खारघरमध्ये झालेल्या दुर्घटनेत उष्माघातामुळे १४ जणांचा मृत्यू झाला. राज्य सरकारने या घटनेची गंभीरतेनं दखल घेतली आहे. त्यामुळेच, आता उन्हाळी सुट्टी याच महिन्यात जाहीर केली जाईल. कदाचित आजपासूनच उन्हाळी सुट्टी देण्यात येईल, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor 

Edited by : Ratnadeep Ranshoor