सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (21:34 IST)

असा पंतप्रधान कधीच नसावा असे म्हणत शास्त्रज्ञ रझा यांची मोदींवर टिका

पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी चुकीची वक्तव्ये करून भारताची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची अनेक वक्तव्ये देशासाठी लाजिरवाणी आहेत. गोमूत्र तपासणीसाठी आयआयटीत रिसर्च करण्यास सांगेल, असा पंतप्रधान कधीच नसावा, अशा शब्दांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गौहर रझा यांनी पंतप्रधान मोदींवर टिका केली आहे. नाशिक शहरात अभिनव शाळेत आयोजित विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं उद््घाटन डॉ. रझा यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते.
 
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांच्या गैर भाषणांना प्रचंड टाळ्या पडतात. मात्र, विरोध करायची हिंमत कुणी करत नाही, ही बाब अतिशय गंभीर आहे. पंतप्रधानांनी काही म्हटलं की, लगेचच त्यावर राज्याचे मुख्यमंत्री, न्यायाधीश आणि शिक्षण मंत्री होकार देतात. गोमूत्रात सोनं शोधण्यासाठी मोठ्या विद्यापीठाला अनुदान दिलं जातं, याहून देशाची बेइज्जती कोणती, असा सवालही त्यांनी केला. या भाषणात केंद्रावर हल्लाबोल करतानाच त्यांनी विद्रोही साहित्यिकांनीही आपली जबाबदारी ओळखावी, असं आवाहन केलं. कृषी कायद्यांविरोधात वर्षभर लढणाऱ्या शेतकऱ्यांचंही डॉ. रझा यांनी कौतुक केलं. शेतकरी नव्या भारताचं स्वप्न साकारण्यासाठी लढले. ही लढाई अजूनही सुरू आहे. शेतकरी आंदोलन डोळ्यांसमोर ठेवत विद्रोही साहित्यिकांनी नव्या भारताचं स्वप्न पाहावं असं सांगितल.