शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जानेवारी 2020 (10:19 IST)

सचिव जे. पी. गुप्ता यांची अखेर उचलबांगडी, किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी

मराठा समाजातील तरूणांच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी स्थापन केलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’मधून इतर मागासवर्ग विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली. सरकारने सारथीची अतिरिक्त जबाबदारी मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे दिली आहे. सारथीतील अनियमितता असल्याच्या आरोपांची चौकशीही निंबाळकर यांच्याकडून केली जाईल. 
 
सारथी संस्थेची स्वयत्तता कायम ठेवावी, या मागणीसाठी राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या तरूणांनी शनिवारी पुण्यात लाक्षणिक उपोषण केले होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी संभाजीराजेंची भेट घेऊन सारथीची स्वायत्तता कायम ठेवण्याचे तसेच गुप्ता यांना पदावरून हटविण्याचे आश्वासन दिले होते.