1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 जानेवारी 2020 (15:57 IST)

भाजप दगाफटका करणार हे आम्हाला माहिती होत : संजय राऊत

We know that BJP is going to strike: Sanjay Raut
भाजप दगाफटका करणार हे आम्हाला माहिती होत. त्यामुळे आम्ही शरद पवारांशी चर्चा सुरु केली होती असे शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत म्हणाले. ते दैनिक लोकमतच्या पुण्यातील पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात संजय राऊत यांची  मुलाखत घेण्यात आली. 
 
अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देऊन भाजपने तुमची सत्तास्थापनेचा प्रयत्न करणारी तीन चाकी गाडी पंक्चर करण्याचा प्रयत्न केला का ? गाडीचे चाक पळवून घेऊन गेले का ? असा प्रश्न संजय राऊत यांना ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी विचारला. त्यावेळी हजरजबाबी असलेल्या संजय राऊत यांनी भाजपने आमच्या गाडीचे चाक नेले नाही तर स्टेपनी पळवून नेली होती असे मिश्किल उत्तर दिले.