बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 जानेवारी 2020 (15:43 IST)

वाचा, चक्क नवऱ्यासाठी बायकोचे आंदोलन

औरंगाबादमधल्या वैजापूरमध्ये नवरा अमेरिकेहून परत येत नाही म्हणून एक बायको चक्क उपोषणाला बसली आहे. सासरच्या दारातच तिचं धरणं आंदोलन सुरू आहे. 'अमेरिकेतून येत कसा नाही, आलाच पाहिजे', 'सून येथे आणि मुलगा अमेरिकेला, अशा सासू सासऱ्यांचं करायचं काय', 'मुलीवरचा अन्याय समाज आता सहन करणार नाही' अशा घोषणा तिन दिल्या. प्राजक्ता डहाळे असं या आंदोलनकर्त्या तरुणीचं नाव आहे. ती थेट सासरच्या दारातच आंदोलनाला बसली आहे. तिच्याबरोबर तिचं अख्खं कुटुंबही उपेषण आणि धरणं आंदोलन केलं.
 
या आंदोलनामुळे अखेर सासऱ्यांना बाहेर यावं लागलं. मुलगा १३ तारखेला येणार आहे. मग सगळं सुरळीत होईल असे मुलीच्या सासऱ्यांनी सर्वांसमोर जाहीर केले.