गुरूवार, 4 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मनसे स्वबळावरच राजकारणात सक्रीय राहणार : बाळा नांदगावकर

MNS will stay active in politics on its own: Bal Nandgaonkar
मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपा आणि मनसेची युती होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बाळा नांदगावकरांनी साम या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, मनसे भाजपासोबत युती करणार नाही. त्यामुळे आगामी काळात मनसे स्वबळावरच राजकारणात सक्रीय राहणार असल्याचे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे.
 
बाळा नांदगावकरांच्या राजकारणात कधीच कोणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो या विधानामुळेच भाजपा आणि मनसेच्या युती होणाच्या चर्चेला उधाण आले होते. तसेच मध्यंतरी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाल्यामुळे भाजपा आणि मनसे आगामी काळात एकत्र येणार असल्याचे सांगण्यात येत होते. सोबतच  देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात आम्ही विचार करू असं मत देखील व्यक्त केले होते.