गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (22:11 IST)

होडावडे येथे काजू फॅक्टरीच्या शेडमधील गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने होडावडे (ता. वेंगुर्ला) येथे एका काजू फॅक्टरी समोरील पत्र्याच्या शेडमध्ये गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल २८६ दारुचे बॉक्स ताब्यात घेण्यात आले आहेत. यात एकूण २० लाख २१ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात वेंगुर्ले येथील संशयित मात्र फरार झाला. सदर कारवाई निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक रणजित येवलुजे, निरीक्षक अमित पाडाळकर, दुय्यम निरीक्षक वायदंडे, जवान सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे यांच्या पथकाने केली.