गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 मे 2022 (09:01 IST)

येवला तालुक्यातील वाईबोथी येथे खडीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका कामगाराचा मृत्यू

death
येवला तालुक्यातील वाईबोथी येथे खडीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका कामगाराचा मृत्यू झाला. खडी क्रेशरवर काम करत असताना रविवारी दुपारच्या सुमारास अचानक हा अपघात घडला. या अपघातात खडीच्या ढिगार्‍याखाली दबून भागवत गवळी (वय २५ रा. बीड) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की चार जेसीबी व पॉकलनच्या सहयाने बारीक खडी बाजूला करून व गॅस कटरने लोखंडी चॅनल कपून अथक परिश्रमानंतर या कामगारला बाहेर काढण्यात यश आले. परंतु तो पर्यंत त्या कामगाराचा मृत्यू झाला होता. सदर घटनेचा तपास येवला तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे हे करत आहेत.