नारायण राणेंची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर तब्येत; पाहूया डॉक्टर काय म्हणाले…
केंद्रीय सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती आता स्थिर असून आराम करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
नारायण राणे नेहमीप्रमाणे आपल्या रुटीन चेकअपसाठी मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये गेले असता हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असल्याचे डॉक्टरांना दिसले.
त्यानुसार त्यांनी अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला होता. दोन दिवसापूर्वी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची तब्येत स्थिर असून त्यांना डिस्चार्ज मिळाला. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.