हनुमानाच्या जन्मभूमीवरून वाद
अयोध्या, काशी आणि ज्ञानवापी नंतर आता हनुमानाच्या जन्मभूमीवरून नवीन वाद सुरु झाला आहे. हनुमानाचा जन्म महाराष्ट्रातील नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या जवळ अंजनेरी येथे झाल्याचा दावा केला जातो. या दाव्याचा महंत गोविंदानंद यांनी निषेध केला असून त्यांनी आक्रमक भूमिका घेत नाशिकच्या अभ्यासक आणि पुरोहितांना आव्हान दिल आहे. त्यांनी नाशिकच्या पुरोहित आणि अभ्यासकांकडून हनुमानाचे जन्म अंजनेरी झाल्याचे पुरावे मागतील आहे. मी हनुमानाच्या असलेल्या जन्मस्थळीसाठी कोणत्याही वादाला समोर जाण्यासाठी तयार असल्याचे ते म्हणाले. महंत गोविंदानंद यांच्या म्हणण्यानुसार हनुमानाचा जन्म किष्किंधा मध्ये झाला आहे.
कर्नाटकातील किष्किंधा नगरीत हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा कर्नाटकमधील मठाधिपतींनी केला आहे. त्यामुळे हनुमानाच्या जन्मस्थळारून नवा वाद सुरू झालाय. परंतु, ही किष्किंदा नगरी नाशिकमधील अंजनेरी पर्वताच्या मागील बाजूस असल्याचा प्रतिदावा सोमेश्वरनंद सरस्वती महाराज यांनी केलाय आणि अंजनेरीतील गावकऱ्यांनी देखील सोमेश्वरनंद सरस्वती महाराजांच्या दाव्याला पाठिंबा दिलाय.
हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी डोंगरावर झाला असं इथल्या लोकांना वाटतं. अंजनेरी हे नाव हनुमानाची आई अंजनीमातेच्या नावावरून पडलं. इथे डोंगरावर अंजनी मातेचं आणि हनुमानाचं मंदिरही आहे.अंजनेरी हे नाशिक जिल्ह्यात त्रयम्बकेश्वर तालुक्यात आले. येथील डोंगराला अंजनेरी नाव देण्यात आले आहे. इथे हनुमानासह अंजनीमातेचे मंदिर देखील आहे. नाशिकच्या पंचवटीत काही काळ श्रीराम, लक्ष्मण आणि सीता माता वास्तव्यास होते.
हनुमानाचा जन्म आपल्याकडे झाला असा दावा दक्षिणेकडच्या दोन राज्यांनी केला.
कर्नाटकचं म्हणणं आहे की हनुमानाचा जन्म हंपीजवळच्या किष्किंधामधल्या अंजेयानाद्री/अंजनाद्री टेकड्यांमध्ये झाला आहे, तर आंध्र प्रदेशचं म्हणणं आहे की तिरुमलाच्या सात टेकड्यांमध्ये (सप्तगिरी) असलेलं अंजनाद्री हे हनुमानाचं खरं जन्मस्थान आहे.रामायणात किष्किंधा नगरीचे उल्लेख येतात. ही किष्किंधा नगरी म्हणजे हंपीजवळ असलेलं किष्किंधा आहे असं कर्नाटकच्या लोकांचं म्हणणं आहे.
हनुमानाचा जन्म नक्की कुठे झाला हे समजून घ्यायचं असेल तर भविष्योत्तर पुराण, स्कंद पुराण आणि पराशर संहितेचा अभ्यास करायला हवा. रामायणात परिपूर्ण हनुमंत चरित्र नाहीये. त्यामुळे पराशर संहितेत पराशर ऋषींनी हनुमानाचं संपूर्ण चरित्र लिहिलं आहे. त्यातही सप्तगिरीमधल्या अंजनाद्रीचा उल्लेख हनुमानाचं जन्मस्थळ म्हणून केला आहे.