1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 29 मे 2022 (15:41 IST)

शहीद सुभेदार विजय शिंदे यांच्यावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार

साताऱ्यातील विसापूर तालुक्यातील खटाव चे सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांना लेह लडाख येथे देशाची सेवा बजावत वीरमरण आले.भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत पडून झालेल्या अपघातात त्यांना वीरमरण आले. त्यांचा निधनाची बातमी त्यांच्या गावी मिळाल्यापासून गेल्या दोन दिवसांपासून विसापूर सह संपूर्ण खटाव गावात शोककळा पसरली. पतीच्या निधनाची बातमी कळतातच त्यांच्या पत्नीने टाहो फोडला. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.  
 
लडाख मध्ये देशसेवाचे कर्तव्य बजावत असलेल्या सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांच्यावर शोकाकुल वातावरण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव जमला होता. फुलांचा वर्षाव करता त्यांची अंतयात्रा काढली. सुभेदार शिंदे यांचे पार्थिव रविवारी सकाळी विसापूर आणण्यात आले. पार्थिव आल्यावर संपूर्ण रस्त्यावर रांगोळी काढली होती आणि त्यांचे बॅनर लावले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले त्यांच्या पत्नी ने हंबरडा फोडला. नंतर त्यांच्यावर कुंभारकी शिवारातील शेतात शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
विजय शिंदे हे 1998 साली मराठा लाईफ इन्फ्रंटी मध्ये लष्करी सेवेत रुजू झाले त्यांनी आपल्या 24 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लष्करात विविध ठिकाणी काम करून देशाची सेवा केली .सध्या ते लेह लडाखला सुभेदार पदावर होते. शुक्रवारी सकाळी 26 जवानांना घेऊन जात असलेले वाहन परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उपसेक्टर हनिफच्या फॉरवर्डकडे जात असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन श्योक नदीत कोसळून झालेल्या अपघातात त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव लेह लडाख येथून दिल्लीत दुपारी 3 वाजेच्या सुमारास आणले. तिथे त्यांना मानवंदना देण्यात आली. या अपघातात 7 जवानांना वीर मरण आले.