शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 29 मे 2022 (15:57 IST)

केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात लवकरच धडकणार

monsoon
उकाड्यापासून हैराण असलेल्या देशातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. नैऋत्य मान्सून केरळ मध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्यानं दोन आठवड्यापूर्वी बंगालच्या उपसागरात धडकलेल्या 'असानी' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे शुक्रवारी मान्सून केरळ मध्ये सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 
साधारणपणे मान्सूनचे केरळमध्ये दाखल झाल्याच्या सात दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो. मान्सून आज केरळ मध्ये दाखल झाला असून येत्या सात दिवसात मान्सूनची महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे. 
 
येत्या 2 ते 3 दिवसांत केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या वर्षी सरासरी अंदाज वर्तवण्यात आला असून चार महिन्याच्या पावसाळी हंगामाची सुरुवात झाली आहे. मान्सून यंदा केरळ मध्ये नेहमीपेक्षा पाच दिवस अगोदर पोहोचला असून शेतीच्या कामाला वेग येऊन देशात मान्सूनचे वारे वाहणार आहे. आणि उष्णेतेपासून लोकांना दिलासा मिळणार आहे. 

भारतीय हवामान खात्यानं सांगितल्या प्रमाणे यंदाच्या वर्षी 2022 मध्ये देशात सरासरी मान्सून पाऊस पडेल. या मुळे आशियातील  तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत शेतीपासून चांगले उत्पादन मिळेल आणि आर्थिक वाढ होईल. 

जगातील सर्वात मोठा शेतीचा उत्पादकांनी शेतमालाचा ग्राहक असणारा भारत देश सिंचन नसलेल्या  50 टक्के शेतजमिनीला पाणी मिळण्यासाठी मान्सूनच्या पावसावर निर्भर आहे. 
 
पुढील 5 दिवसांत केरळ आणि लक्षद्वीप मध्ये मध्यम आणि हलक्या पावसाचा आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, पुडुचेरी आणि कराईकल मध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसतील. 

येत्या 4 दिवसांत जम्मू- काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलक्या आणि मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.    

तर पुढील 2 ते 3 दिवसांत उत्तराखंड, उत्तर पंजाब, उत्तर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थान मधील दुर्गम भागात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवली आहे.