शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 मे 2022 (08:51 IST)

४ दिवस राज्याच्या या भागात जोरदार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

राज्याच्या अनेक भागात उद्यापासून मान्सून पूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. यासंदर्भात भारतीय हवामानशास्त्र विभागाने इशारा दिला आहे. आज पासून (३० मे) पुढील चार दिवस राज्याच्या अनेक भागात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.३१ मे रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस होईल.

१ जून रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल.२ जून रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज विभागाने दिला आहे.