शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (21:15 IST)

पुढील २४ तासांसाठी महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचा इशारा

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा मोठा परिणाम महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर झाला आहे. त्यामुळेच  उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस होत आहे. आता पुढील २४ तासांसाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने इशारा दिला आहे. त्यानुसार, येत्या २४ तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबई, ठाणे, पुणे व इतर काही ठिकाणी तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा या भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मच्छिमारांनी तास अरबी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाऊस, थंडी आणि ढगाळ वातावरण सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय विपरीत स्वरुपाचे हे हवामान आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. आवश्यकता असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.