मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 एप्रिल 2022 (12:27 IST)

ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

भारतरत्न गान कोकिळा लता मंगेशकर यांचे लहान बंधू ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना प्रकृतीच्या अस्वस्थेमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांना  प्रकृतीच्या काही तक्रारी असल्यामुळे रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना येत्या 10-12 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. अशी माहिती त्यांच्या मुलाने आदिनाथ मंगेशकर याने दिली. 
 
अलीकडेच भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार सोहळा माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या  प्रसंगी पंडित हृदयनाथ यांचे पुत्र आदिनाथ यांनी समारंभाला उपस्थित असलेल्या मान्यवरांना संबोधित केले आणि वडील पंडित हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली. त्यांची प्रकृती आता स्वस्थ असून लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्याची माहिती दिली.