बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जुलै 2019 (09:39 IST)

धक्कादायक एका घरात सुरु होता वैश्य व्यवसाय अहमदनगर पोलिसांनी केली कारवाई

नगर शहरातील तपोवन रोड भागात वेश्या व्यवसाय करणाऱ्या घरावर पोलिसांनी छापा टाकत पाच पुरुष, एका महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे, तर एकीची सुटका करण्यात आली. तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली. महिलांना तोफखाना पोलिसांनी घेतले ताब्यात आहे. अर्जुन भुजबळ, संतोष भुजबळ, समीर शेख, कैलास क्षिरसागर, अक्षय दरंदले ही अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, शहरातील तपोवन भागात एका घरात कोणाला शंका येणार नाही अश्या पद्धतीने वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, महिला पोलीस उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे, पोलीस कर्मचारी विश्वास गाजरे, तरटे, शाईन पठाण आदींच्या पथकाने तपोवन रोड भागातील श्रावणी कॉलनी येथील एका घरावर छापा टाकला. तेथे काही महिला व पुरुष आढळून आल्या. पोलिसांनी पाच पुरुष व एका महिला एजंटलाा ताब्यात घेतले आहे, तर एका पीडितेची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.