गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जुलै 2019 (09:48 IST)

राष्ट्रवादीस मोठा धक्का हा आमदार शिवसेनेत जाणार

राष्ट्रवादीचे आमदार पाडुरंग बरोरा यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनंतर पाडुंरंग बरोरा हे आता लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे.ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला. बरोरा यांचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याशी जवळचे संबंध आहेत. यामुळे बरोरा हे सेनेत प्रवेश घेतील या चर्चेला उधाण आले आहे.दरम्यान, शहापूरचे बरोरा कुटुंब हे १९८० पासून पवार कुटुंबासोबत होते. मात्र त्यांनी आज आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी पासून फारकत घेतली आहे.