गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018 (17:20 IST)

ओबीसींच्या उत्थानासाठी राज्यात शरद पवार साहेबांचा सिंहाचा वाटा - राजेश टोपे

फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणीचा प्रसार व प्रचार करणारे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे  यांना सहकार्य करा तसेच ओबीसी घटकातील तरूणांनो, स्वतः पुढाकार घेऊन मुख्य प्रवाहात या, असे आवाहन माजी मंत्री आ. राजेश टोपे  यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या आढावा बैठक व मेळावा या कार्यक्रमात केले. हा कार्यक्रम जामखेड, अंबड येथे घेण्यात आला. आघाडीचे सरकार असेपर्यंत विद्यार्थ्यांना, शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांना उच्चशिक्षणात शिष्यवृत्ती दिली. युवकांना घडवले, पण भाजप-सेना सरकार या विद्यार्थ्यांना सवलती देत नाही हा निव्वळ जातीवाद आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण यासाठी संगठित व्हा, संघर्ष करा, असे आवाहनही त्यांनी केले.
 
बदनापूर विधानसभा मतदारसंघ येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, बबलू चौधरी, अॅड.सचिन आवटे, निसार देशमुख, संजय काळबांडे, बळीराम कुडपे, रमेश पैठणे, कैलास पिगे, रशीद मोमीन, प्रमोद जरडे, समद बागवान, बाबासाहेब बोंबले, कल्याणराव पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.