1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Sharad Pawar discharged from Hospital in Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. माहितीनुसार छातीतील संसर्ग आणि खोकल्याच्या त्रासामुळे त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांनंतर त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली असून त्यांची तब्येत आता पूर्णपणे स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते थेट मुंबईतील त्यांच्या 'सिल्व्हर ओक्स' या निवासस्थानी रवाना झाले आहे. डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती समाधानकारक असून डॉक्टरांनी त्यांना काही दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तसेच ते रुग्णालयात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल, आणि उद्योगपती गौतम अदानी यांसारख्या अनेक प्रमुख नेत्यांनी व व्यक्तींनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
पुढील लेख
IND vs PAK: दिवाळीच्या दिवशी भारतीय संघ पाकिस्तानचा सामना करणार; वेळ लक्षात घ्या