मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (16:09 IST)

जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले - शरद पवार

Sharad Pawar emotional on Lata Mangeshkar death news
मुंबई दि. ६ फेब्रुवारी - जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. 
 
लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील असे सांगतानाच शरद पवार यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.