सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जून 2024 (20:31 IST)

अजित पवार गटाचे नेते आमच्या संपर्कात असल्याचा शरद पवार गटाचा दावा, शरद पवार म्हणाले-

sharad panwar
राज्यात पुन्हा एकदा भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार गटातील काही सदस्यांच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटाने केला होता. या वर आज शरद पवारांनी मौन सोडले आहे ते म्हणाले, जे पक्षाला मदत करतील आणि पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवतील अशा लोकांच्या पुनरागमनाचे स्वागत करायला हरकत नाही. मात्र ज्या लोकांनी पक्षात राहून पक्षाचे फायदे घेतले, पक्षाचे नुकसान करण्यासाठी कट कारस्थान केली. अशा लोकांबद्दल पक्षश्रेष्ठीचे मत घेतले जाणार. .

शरद पवारांच्या या प्रतिक्रियेनंतर महाराष्ट्रात अजित पवार गटात घबराट पसरली आहे. याबाबत खुलासा करताना अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले, शरद पवार साहेबांचे विधान जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे. त्या विधानात काहीही तथ्य नाही. आमचे आमदार आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून कोणीही कुठेही जात नाही. आणि तशी शक्यताही नाही. 
लोकसभा निवडणुकीच्या निकालात शरद पवारांना मोठे यश मिळाले. राष्ट्रवादीने (शरद पवार) 10 जागा लढवून 8 जागा जिंकल्या. दुसरीकडे अजित पवार यांनी 4 जागा लढवल्या होत्या, मात्र सुनील तटकरे यांच्या रायगडची जागा वगळता त्यांना कोणतेही यश मिळाले नाही. मात्र, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचाही बारामती मतदारसंघातून सुप्रियासुळे यांच्याकडून पराभव झाला.  
 
लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या सोबत गेलेले अनेक आमदार शरद पवारांच्या गटात येण्याचे इच्छुक आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे वृत्त आहे या या बाबत पक्षामध्ये सकारात्मक वातावरण असल्याचे विधान शरद पवारांनी केलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अजित पवार गटातील काही आमदार शरद पवारांकडे घरवापसी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 
Edited by - Priya Dixit