अहमदनगर येथील जागा शरद पवार यांनी सुजय विखेसाठी सोडली
काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यामधील जागा वाटपाचा मोठा तिढा जवळपास मिटला आहे. अहमदनगरच्या ज्या जागेसाठी आतापर्यंत जोरदार चर्चा सुरु होती, ती जागा काँग्रेसला सोडली आहे. राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकलूजमध्ये बोलताना याबाबत घोषणा केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे ही जागा लोकसभेत लढवायला इच्छुक आहेत. नगरची ही जागा आमच्यासाठी सोडावी, अशी मागणी काँग्रेसकडून राष्ट्रवादीला केली होती. आघाडीत ही जागा राष्ट्रवादीची आहे.
अहमदनगरच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडूनही अगोदर ताठर भूमिका घेतली, मात्र पण कॉंग्रेसचे जेष्ठ नेते विखे पाटलांची नाराजी वाढली होती. अखेर पवारांनीच पुढाकार घेत हा तिढा सोडवला आहे. अगोदर शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि सुजय विखे यांचीही याबद्दल चर्चा झाली. पवारांनी सुजयला नातू समजून जागा सोडावी, असं आवाहन विखे पाटलांनी केलं होतं. त्यामुळे आघाडीतला सर्वात मोठा तिढा सुटला आहे.