बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मार्च 2019 (10:03 IST)

अमोल कोल्हे करणार राष्ट्रवादीत प्रवेश शिवसेनेला जय महाराष्ट्र

टीव्ही मालिकेतून छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करतील असे चित्र आहे. अमोल हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची जोरदार शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित प्रवेश करण्याची शक्यता असून, त्यांनी जर राष्ट्रवादीत प्रवेश केला तर लोकसभा निवडणुकीआधी शिवसेनेला हा मोठा धक्का असणार. अमोल कोल्हे हे चित्रपट सेनेचे अध्यक्ष असून, मूळचे शिरुर येथील रहिवासी आहेत. तर  कोल्हे राष्ट्रवादीकडून शिरुरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली आहे. सोबतच डॉ. अमोल कोल्हे यांच्याशिवाय दोन माजी आमदारही शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असे चित्र आहे. . त्यांच्या पक्ष प्रवेशाच्यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील हेही उपस्थित असतील. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली, त्यावळेी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाडही त्यांच्यासोबत होते. अभिनेते अमोल कोल्हे हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याने हा शिवसेनेसाठी ऐन लोकसभा निवडणुकांत मोठा धक्का असून, अमोल यांनी  २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.