मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (14:21 IST)

शरद पवारांनी केलं नितीन गडकरी यांचं कौतुक

आज अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गाचं भूमिपूजन व लोकार्पण सोहळा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित झाला. या वेळी पवार, गडकरी एकाच मंचावर उपस्थित होते.
 
यावेळी शरद पवारांनी नितीन गडकरींच्या कार्यशैलीचं कौतुक केलं. पाच राष्ट्रीय महामार्ग नगर जिल्ह्यातून जाणार आहेत. अडलेली भूसंपादन कामे मार्गी लावा, अशा सूचना गडकरींनी दिल्या आहेत.
 
यावेळी गडकरी म्हणाले की मला मोठी कामं द्या. जी हजार- दोन हजार कोटींच्या वरची आहेत. तुमच्या जिल्ह्यातील महत्त्वाचे रस्ते मी भारत माला- २ मध्ये नक्की घेईन, असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.
 
गडकरी कामं मंजूर करताना राजकारण पाहत नाहीत तर मागणी पाहतात. त्यामुळं सर्व पक्षाच्या लोकांची कामे होतात. गडकरी यांच्या कार्यक्रमाला गेलं की दोन चार दिवसांत बदल दिसून येतो. एखादा नेता देशाच्या उभारणीत कसं योगदान देतो हे गडकरी यांच्याकडे पाहून लक्षात येतं, अशा शब्दांत पवारांनी गडकरींच्या कामाचं कौतुक केलं.