गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

साखर कारखानदारीचे आर्थिक गणित बिघडले: शरद पवार

मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे 'ऊस विकास कृती कार्यक्रम' या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्राचे उदघाटन माजी केंद्रीय कृषीमंंत्री आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष खासदार शरद पवार  यांनी केले. साखर कारखानदारीचे आर्थिक गणित बिघडलेे असून कारखान्यांनी भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ऊस विकास आराखडा गांभिर्याने राबविण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
 
वसंतदादा शुगर इन्स्टिटयुटने, पुणे येथे ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी ऊस विकास कृती कार्यक्रम चर्चा सत्राचे आयोजन केले आहे. उदघाटना प्रसंगी उपस्थितांसमोर शरद पवार यांनी  आपले मत मांडले. पवार म्हणतात की  आपल्या राज्यात ऊसापेक्षा साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आता राज्यात कारखाने न काढलेले बरे. उत्तर प्रदेशने ऊसाची उत्पादकता आणि साखर उतारा वाढवला आहे. पण महाराष्ट्रात ऊसाची उत्पादकता झपाट्याने कमी होऊ लागली आहे. राज्य कारखानदारी, ऊस उत्पादकता, उतारा, हंगामाचे दिवस व बाजारपेठा या सर्व बाबींमध्ये पिछाडीवर आहे. ऊस उत्पादकता न वाढवल्यास राज्यातील संपूर्ण कारखानदारी अडचणीत येईल. देशातील आणि विदेशातील साखर उद्योगाचा आढावा घेतला असता महाराष्ट्रासमोरील आव्हान मोठे आहे. माझी सर्व साखर कारखान्यांना विनंती आहे की त्यांनी ऊस विकास कृती कार्यक्रम हाती घ्यावा. त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिटयुटकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असे मत पवार यांनी व्यक्त केले आहे .