शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (08:16 IST)

शरद पवार यांचा राज्यपालांना पत्रातून जोरदार टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख करत पत्र पाठवले होते. त्या पत्राला पवार यांनी पत्राद्वारेच प्रत्युत्तर दिलंय. 
 
राज्याच्या राज्यपाल सचिवालयातर्फे नुकतंच 'जनराज्यपाल : भगतसिंह कोश्यारी' नावाचं एक कॉफीटेबल बुक प्रकाशित केलं आहे. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी शरद पवार यांना कॉफी टेबल पुस्तक पाठवले होते. या पुस्तकाला अभिप्राय देताना खरमरीत पत्र लिहिलं आहे आहे. पवार म्हणतात की, पुस्तकात मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची व त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही. भारतीय संविधानात जनराज्यपाल असा उल्लेख आढळत नाही. तरीही राज्य शासनाच्या वतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधी प्रकाश टाकणारे कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद, अशी शेरेबाजी पवारांनी केली आहे.
 
पवार पुढे म्हणतात की, निधर्म वादासंदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही. पुस्तकात एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ दीक्षांत समारंभ सोहळे, उच्चपददस्थ गाठीभेटी सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्र आहेत.