मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 26 ऑक्टोबर 2020 (10:47 IST)

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास कोरोना पॉझिटिव्ह

रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) Reserve Bank of India (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांना रविवारी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दास यांनीच याची माहिती दिली असून कोरोनाची लक्षणे जाणवत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
 
दास यांनी ट्विट करत कोरोना बाधित असल्याची माहिती दिली. तसेच बरे वाटत असून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना सूचना देण्यात आली आहे, असे ते म्हणाले. मी आता आयसोलेशनमध्ये काम करणार आहे. यामुळे आरबीआयच्या कोणत्याही कामावर परिणाम होणार नाही. टेलिफोन आणि व्हीसीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहिन, असे ते म्हणाले.