रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (07:50 IST)

२४ तासांमध्ये ३२७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

राज्यात २४ तासांमध्ये आणखी ३२७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत. तर, एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या आता २३ हजार ३६० वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ हजार ९७५ जण, करोनामुक्त झालेले २० हजार १३९ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या २४६ जणांचा समावेश आहे. 
 
राज्यातील एकूण २३ हजार ३६० कोरोनाबाधित पोलिसांमध्ये २ हजार ५६३ अधिकारी व २० हजार ७९७ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)२ हजार ९७५ पोलिसांमध्ये ३६५ अधिकारी व २ हजार ६१० कर्मचारी आहेत.
 
कोरोनातून बरे झालेल्या झालेल्या २० हजार १३९ पोलिसांमध्ये अधिकारी २ हजार १७३ व १७ हजार ९६६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या २४६ पोलिसांमध्ये २५ अधिकारी व २२१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.