शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (21:41 IST)

आणि शरद पवार म्हणाले आमची पोरं काय करतील याचा नेम नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाने पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर एका मुलीला प्रपोझ केला अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. तसेच आमची पोरं काय करतील याचा नेम नाही असं मिश्किल वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. दरम्यान ही घटना सांगताना शरद पवारांनाही हसू आवरता आलं नाही. पवारही मनसोक्त हसून पत्रकार मंडळी आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांना किस्सा सांगत होते. शरद पवार यांनी राज्यातील घडामोडींवर मत व्यक्त केलं असून लखीमपुर घटना आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून भाजपवर निशाणा साधला आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाची बातमी दिली आहे. शरद पवार यांनी सांगितले की, आमचे सर्व सहकारी आहेत त्यातील एकाची आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या चिरंजीवांची आहे. जयंत पाटील यांच्या चीरंजीवांनी पॅरिसमध्ये काल रात्री आयफेल टॉवरवर एका मुलीला प्रपोझ केला. त्यावर दोन्ही बाजूने होकार मिळाला आहे. त्यामुळे आता आम्ही थेट पॅरिसमध्ये पोहोचलो असून इस्लामपूरपर्यंत सिमित नाही. आम्हाला आता काळजी घ्यावी लागेल आमची मुलं कधी काय करतील त्याचा नेम नाही असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.