रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 (12:06 IST)

महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुण्यात शरद पवार यांची पहिली सभा

sharad panwar
देशात लोकसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने आता जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. त्यात आता जागा वाटपात महाविकास आघाडीने आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे देखील महाविकास आघाडीचे ठरले आहे.
 
आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची एक बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात रणनीतीवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट महाराष्ट्रातील कोणत्या लोकसभा मतदारसंघावर दावा करू शकतो, या संदर्भात आज सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये साधारणपणे १२ ते १३ जागा शरद पवार गटाला मिळणार असल्याची माहिती आहे.
 
विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत पक्ष मानला जातो. राष्ट्रवादीतील फुटीनंतरही शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपली ताकद अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पश्चिम महाराष्ट्रातील बारामती, शिरूर, माढा, सातारा या जागा लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे शरद पवार गट काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र या चर्चा निरर्थक असल्याचे शरद पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आले.


Edited By- Ratnadeep Ranshoor