गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (16:41 IST)

परमबीर हा महाराष्ट्र सरकारचा जावई असल्यासारखं वर्तन का केलं जातंय, शेलार यांचा सवाल

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी परमीर सिंग गायब होण्यामध्ये राज्यातील ठाकरे सरकार असल्याचा आरोप केला आहे. तसेच परमबीर सिंग सापडले तर ठाकरे सरकारचं पितळ उघडं पडेल. यामागे मोठे कटकारस्थान असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत परमीबर यांचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारवर  आरोप केले होते.
 
परमबीर रस्ते मार्गे विदेशात गेला असेल तर ज्या राज्यांतून जाऊ शकतो. त्या राज्यात भाजपची सरकारं आहेत, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं होतं. नवाब मलिक यांचे आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी खोडून काढले आहेत.
 
आशिष शेलार म्हणाले, नवाब मलिक हे कपोलकल्पित आरोप करत आहेत. मुळात परमबीर सिंग यांच घर महाराष्ट्रात आहे.रेशन कार्ड, आधार कार्ड माहाराष्ट्रातील आहे.
 
मग तो महाराष्ट्रातून पळून कसा गेला, याचं उत्तर राज्यातील सरकारने द्यायला हवं.महाराष्ट्रात अशी कोणती एजन्सी आहे आणि असे कोण लोक आहेत.जे परमबीर यांना मदत करत आहेत. परमबीरच्या मार्फत राज्य सरकारनं अशा कुठल्या कारवाया केल्या आहेत की राज्याचे मुख्यमंत्री किंवा अन्य कोणताही मंत्री त्याच्याबद्दल तोंड उघडत नाही.
परमबीर हा महाराष्ट्र सरकारचा जावई असल्यासारखं वर्तन का केलं जातंय, असा सवाल शेलार यांनी केला.
 
परमबीर सिंगची मालमत्ता का जप्त केली गेली नाही ? लुकआउट नोटीसला उशीर का झाला ?परमबीर पळून जाईपर्यंत राज्य सरकारनं वाट का पाहिली ? अशा कोणत्या गोष्टी ठाकरे सरकारनं परमबीर सिंगकडून करुन घेतल्यात.ज्या उघड झाल्या असत्या तर अडचण झाली असती.परमबीर पळून गेलाच असेल तर यास महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचे शेलार यांनी म्हटले.