शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (16:36 IST)

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे : संजय राऊत

अनिल देशमुखांची अटक दुर्देवी आणि कायद्याला आणि नितीमत्तेला धरुन नाहीये. अनिल देशमुखांवर आरोप करणारे पळून गेलेले नाही त्यांना पळवून लावले आहे. जे देशाबाहेर पळून गेले आहेत तो केंद्रीय सत्तेच्या मदतीने पळून जाऊ शकतो. मुंबई पोलस खात्याचा एक अधिकारी जेव्हा देश सोडून जतो. तेव्हा त्याला केंद्रीय सत्तेचे पाठबळ असते. त्यांनी आरोप केला आणि पळून गेले. त्याने केलेल्या आरोपांनुसार केंद्रीय यंत्रणा अटक करतेय. चौकशी तपास होऊ शकतो मात्र, पहिल्याच भेटीत अटक करणं चुकीचं आहे. त्रास देण्याचा हा प्रकार मुद्दाम केला जातोय. हे सगळ ठरवून केलं जातंय. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे,’ असा आरोप एकापाठोपाठ महाविकास आघाडीवर हल्ले होत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत  यांनी केला आहे.
 
‘अजित पवारांच्या संपत्तीवर जप्ती आणली जाते. मग, भाजपचे लोक जंगलात राहतात का? की त्यांच्या काहीच संपत्ती नाही आणि त्या वैध मार्गाने आहेत का?, असा सवाल करतानाच त्यांची माहिती आ्ही केंद्रीय यंत्रणांना दिली आहे मात्र, त्यांच्यावर अजून कारवाई झाली नाही. त्यांची बायकापोरं म्हणजे कुटुंब आणि आमची रस्त्यावर राहातता का? हे घाणेरडं राजकारण त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही आणि आज टणाटण उड्या मारणाऱ्यांना उद्या तोंड लपवावं लागेल,’ असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.